तर मी तिथेच राजीनामा दिला असता उदयनराजे

71
Adv

संसद भवनात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला. माध्यमांशी बोलतांना भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता असं ही ते म्हणाले आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही”

ते पुढे म्हणाले,’संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत? संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही, कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको, मी का राजीनामा देऊ? जे घडलंच नाही, त्याबद्दल कशाला राजीनामा देऊ? मी माझी शपथ नीट घेतली. ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. असं म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चांगलाच टोला लगावला आहे.

Adv