अपर जिल्हाधिकारी पदाच्या एकूण १०५ रिक्त जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी ६५, तर आरक्षित गटासाठी ४० जागा निश्चित केल्या होत्या. यापैकी सर्वसाधारण गटातील (६५ पैकी) ६१ जागांवर पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. आरक्षित गटातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे आरक्षित ४० पदांची यादी अद्याप जाहीर केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अपर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारने अखेर गुरूवारी सायंकाळी उशिरा जारी केला आहे. त्यानुसार तब्बल ६१ उप जिल्हाधिकाऱ्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.
पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव रामदास खेडकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे खासगी सचिव चंद्रकांत थोरात, जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव रविकांत कटकधोंड यांचाही समावेश आहे.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे
विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी
गजानन पाटील
महेश पाटील
शरद पाटील
पंकज देवरे
आशा खान – पठाण
राजलक्ष्मी शाह
सोनाली मुळे
अमोल यादव
अजय मोरे
फरोग अख्तर गुलाम रसूल मुकादम
प्रकाश अहिरराव
नवनाथ जरे
जितेंद्र वाघ
जितेंद्र काकुस्ते
प्रवीण महाजन
विद्युत वरखेडकर
रवींद्र धुरजड
स्वाती देशमुख
दीपक क्षीरसागर
रूपाली आवले
किशोर पवार
अजय लहाने
धनंजय गोगटे
सुरज वाघमारे
नितीन महाजन
चंद्रकांत थोरात
निशिकांता सुके
रामदास सिद्धभट्टी
सत्यनारायण बजाज
समीक्षा चंद्राकर
राजेश मुठे
तरूणकुमार खत्री
अशोक मुंढे
वामन कदम
पांडूरंग कुलकर्णी
अंकुश पिनाटे
अनंत गव्हाणे
राजेश काटकर
अजिंक्य पडवळ
तुषार ठोंबरे
अभय करगुटकर
रेश्मा वाघोले
अरविंद लोखंडे
रामदास खेडकर
उन्मेष महाजन
घनश्याम भुगांवकर
शंकर बर्गे
धनंजय निकम
राजेश खवले
मनिषा जायभाये
वैशाली इंदाणी – उंटवाल
सोनाप्पा यमगर
धनंजय सावळकर
मायादेवी पाटोळे
मंजुषा मिसकर
शिरीष पांडे
आनंद वालस्कर
रविकांत कटकधोंड