महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘भारत की लक्ष्मी’ हे महान महिला व्यक्तीमत्वांची ओळख देणारे प्रदर्शनाचे उदघाटन विधानपरिषदच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आज दि. ०५ नोव्हेंबर, २०१९ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सचिव मंजुषा मोळवणे, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, सचिव श्रद्धा शर्मा-जोशी आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नव नियुक्त सदस्यांच्या मिटींगला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. दरम्यान ना.डॉ.गोऱ्हे यांनी सविस्तर मार्गदर्शन नवनिर्वाचित सदस्यांना केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माविम यांना अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी उपसभापती या नात्याने प्रयत्न वारंवार बैठक घेऊन शासनाकडे प्रलंबित मागण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
यादरम्यान ना.डॉ.गोऱ्हे माविमच्या कार्यालयाला भेट देऊन कार्यालयीन कामाबाबत सूचना दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांच्यासह महिला आयोगाचे अधिकारी दिपरत्न सावंत, कपालिनी सिनकर उपस्थित होते.