शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप सोबतच सत्ता स्थापन करावी

79
Adv

शिवसेने ने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप या आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे. भाजप ने ही दोन पाऊले मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेने सोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावे. 30 वर्षे जुन्या युती च्या भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुंबई आल्यानंतर भाजप चे विधिमंडळाचे नेते देवेंद्र फडणवीस; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ; भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ; शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. महायुतीला जनतेने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे फार चांगले नाही असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दुबई येथून पाठविलेल्या संदेशात व्यक्त केले आहे. सध्या ते दुबई दौऱ्यावर आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत योग्य दिशेने चर्चा चालू आहे असे म्हंटले असले तरी त्यांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत युती करण्याची दिशा चुकीची आहे. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा करण्याची योग्य दिशा भाजप आहे. कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे . त्यामुळे भाजप शिवसेने मध्ये दिलजमाई करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

Adv