रविकांत तुपकर हे गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याने येत्या 2 दिवसात तुपकर भाजप वासी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीकडे जोरदार मागणी केली होती. परंतु फार आग्रह न धरल्याने सदर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आला होता. त्यामुळे नाराज रविकांत तुपकर भाजपच्या गळाला लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता पाहता तुपकर भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून तुपकर मुंबईत असल्याचे समजते