जनतेला विकासापासून प्रगतीपासून काँग्रेस आणि इतर पक्षांनी वंचित ठेवले आहे.70 टक्के लोक आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच,देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रणित सरकार आज सत्तेत आहे. मोदीजींनी राबवलेल्या विकासाच्या योजना आपण तळागाळात पोहचवला पाहिजेत असे मत खा. उदयनराजे यांनी व्यक्त केले.
सातारा लोकसभा मतदार संघातील टिफिन बैठकीत बोलत होते.यावेळी आ.जयकुमार गोरे,प्रदेशउपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे,धैर्यशील कदम,सुरभी भोसले,सुनील काटकर पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा पहिला आमदार म्हणून मी होतो. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनख्या भेट दिलेले आहेत कारण शिवाजी महाराजांनी गमिनी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे आणि या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे यासाठीच मी त्यांना भेटलो आहे. मी तुमच्या मधीलच एक आहे, माझी पूर्व पुण्याई म्हणून मी या घरात जन्माला आलेलो आहे. मी ही एक माणूसच आहे आणि माणसाकडूनच चुका होतात, मी काय देव नाही त्यामुळे आपण सर्वजण एकमेकाला समजूनच घेत पुढे गेलो पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण आगामी निवडणुका एक संघपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे . त्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यत पोहचायला हव्यात असे आवाहन उदयनराजे यांनी केले .
आ. जयकुमार गोरे म्हणाले कि खासदार उदयनराजे भोसले हे जिल्ह्याच्या नाहीतर राज्य पातळीवर कार्यरत दिसले पाहिजे ते मला आज दिसत आहेत. त्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. या राज्यात फक्त छत्रपतींचा आदेश चालतो त्याच छत्रपतींच्या वारसदारांनी आजच्या टिफिन बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे आजच्या बैठकीस महत्त्व आले आहे. यावेळी कार्यक्रमात पदाधिऱ्यांना सुरभी भोसले, धैर्यशील कदम,मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावस्कर, आदींनी मार्गदर्शन केले.