विकास कामांवर टीका करणाऱ्यांनी आपण काय केले हे पाहावे छ उदयनराजे भोसले

179
Adv

एखाद्या माणसाने जी विकास कामे केली त्यावरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते.गेल्या तीन दशकाच्याराजकारणात समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास कामांना आजपर्यंत मी प्राधान्य दिले आहे छ उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही जे विकास कामांवर टीका करतात त्यांनी आपण स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असा अप्रत्यक्ष टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला

येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत छ उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सर्वांशी संवाद साधला यावेळी सुनील काटकर माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, संजय शिंदे निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत संग्राम बर्गे, बाळासाहेब गोसावी काका धुमाळ स्मिता घोडके,सुजाता राजेमहाडिक,अनिता घोरपडे,विजय बडेकर सागर साळुंखे गणेश जाधव सौरभ सुपेकर पंकज चव्हाण आशुतोष खरे आकाश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

खासदार छ उदयनराजे भोसले म्हणाले ज्या वेळेला मी माझ्या समाजकारणाची साताऱ्यातून सुरुवात केली त्यावेळेला साताऱ्याचा बायपास रस्ता नव्हता . समाजकारणातून सर्वसामान्यांचा विकास हे माझ्या कामाचे सूत्र होते . गेल्या तीन दशकाच्या वाटचालीत साताऱ्यात जास्तीत जास्त विकास कामे करून सातारा शहराला उन्नत स्थान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे . साताऱ्यात मूलभूत सुविधा या शहरातील सुज्ञ नागरिकांनी स्वीकारले असून येणाऱ्या नव्या पिढीला नवीन कामांच्या संधी दिल्या पाहिजेत याकरता सातत्याने रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे . एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते छ उदयनराजे मात्र विकास कामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही . एखाद्याची पत ही त्यांने केलेल्या विकास कामावरून ओळखली जाते वीस वर्षांपूर्वी साताऱ्यात आलो तेव्हा मूलभूत सुविधांची प्रचंड अडचण होती मात्र आज सातारा विविध विकासकामांनी युक्त असा आहे जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी मात्र स्वतःला अगोदर विचारावे आपण काय काम केलं . उगाच नुसतं हे केलं ते केलं असं सांगण्यापेक्षा मूलभूत विकास कामे आपण त्यावेळी का केली नाही ? याची उत्तरे संबंधितांनी द्यावीत असा राजकीय टोला छ उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला

छ उदयनराजे पुढे म्हणाले छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी लोक सहभागातून राज्यकारभाराची सुसूत्रता राबवली तो प्रामाणिक प्रयत्न सध्याच्या प्रशासनामध्ये असणे गरजेचे आहे . सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली त्याचा विकास का झाला नाही ?असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला छत्रपती शाहू स्टेडियम साताऱ्यात असताना सुद्धा तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने भरू शकत नाही ही शोकांतिका आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली

साताऱ्याला उन्नत दर्जा देण्याकरता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मी कुठेही कमी पडणार नाही अशी स्पष्ट वाही उदयनराजे यांनी दिली जलमंदिर येथे सर्वसामान्यांना प्राधान्य दिले जात नाही त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते अशा तक्रारी कार्यकर्त्यांमधून आल्या त्यावेळी उदयनराजे म्हणाले आपल्याला नीट वागणूक मिळत नाही म्हणजे काय मला समजेल असे सांगा म्हणजे त्या पद्धतीची व्यवस्था करायला सांगतो या प्रश्नावर कार्यकर्ते निरुत्तर झाले कोणीही उगाच बिन बुडाचे आरोप करू नका त्याला काहीतरी बेस ठेवा असे उदयनराजे म्हणाले युवा उद्योजक संग्राम बर्गे म्हणाले विलासपूर सारख्या नव्याने सातारा पालिकेच्या हद्दीत आलेल्या क्षेत्रात तब्बल साडेपाच कोटींची विकास कामे उदयनराजे यांच्या माध्यमातून सुरू आहेत .महाराज साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आपण एक मुखाने सातारा पालिकेच्या निवडणुकीची तयारी करूया असे ठाम अभिवचन शिरीष चिटणीस यांनी दिले

Adv