सातारा विकास अभियान सुसंवाद बैठक संपन्न

329
Adv

आज सातारा विकास अभियानाच्या माध्यमातुन सुसंवाद साधताना आजपर्यंत बराच पल्ला गाठला आहे, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. म्हणूनच ठरवलेले उदिष्ट आपण एकविचाराने साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करुया अशी साद घालत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काहीही झाले तरी घराण्याचा वारसा आणि वसा तितक्याच तोलामोलाने जपताना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करीत राहणार असे आश्वासक अभिवचन दिले.

​सातारा विकास अभियान सुसंवाद बैठकीत अध्यक्षस्थानावरुन कार्यकर्ते आणि जेष्ठमार्गदर्शक यांच्या उपस्थितीत संबोधित करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी मंचकावर माजी आमदार सदाशिव सपकाळ, जेष्ठ मार्गदर्शक ढाणे बापु, जि.प.साताराचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, सौ.अर्चनाताई देशमुख, संदिप शिंदे, समृध्दीन जाधव, पं.समितीचे माजी उपसभापती विजय काळे, पं.समिती सदस्य, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

​आजपर्यंत झालेली विकासकामे आपणा सर्वांसमोर आहे. रोजगार निर्मितीसाठी इनोव्हेटीव्ह साताराच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. नुकताच रोजगार मेळावा घेवून त्यात सुमारे 1400 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. असे मेळावे वारंवार घेतले जाणार आहेत. तसेच मोठया इंडस्ट्रीजसाठी प्रसिध्द उदयोगपती श्री.बजाज, श्री. बाबासाहेब कल्याण यांच्यासह अनेक उदयोगपतींशी चर्चा सुरु आहे. सातारा येथे आयटी पार्क करीता पशुसंवर्धन विभागाची जागा उदयोग मंत्रालयाकडे हस्तांतकरणाचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून बचत गटामार्फत उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी सातारा,पुणे,मुंबई आदी ठिकाणी शासनाकडून जागा उपलब्ध करुन देणेची कार्यवाही केली जाईल. सातारा जिल्हयात जागतिक पर्यटन स्थळे आहेत, निसर्ग समृध्द भागात पर्यटनाला चालना देवून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. कारखान्याच्या बंद असलेल्या उपसा सिंचन योजना सुरु करणेबाबत ठोस कार्यवाही तसेच कोयना, कण्हेर, महु धरणग्रस्तांचे पूनर्वसन या सर्व बाबींविषयी आम्ही प्रयत्नवादी आहोत असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हयातील इंडस्ट्रीजमध्ये स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून आग्रही भुमिका घेतली तर खंडणीसारखे गुन्हे दाखल होतात, सातारा आणि नगरची एमआयडीसी एकाच वेळी सुरु झाली परंतु नगरची एमआयडीसी खुप पुढे गेली, सातारची एमआयडीसी त्याच्या 10 टक्के सुध्दा कार्यान्वित झाली नाही ही दुरावस्था का झाली याचा कधीतरी विचार करण्याची वेळ आली आहे. का झाले, कसं झाले यामध्ये न पडता आता याबाबतीत आम्ही अधिक जागरुक राहणार आहे. आजपर्यत आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वेळ प्रसंगी तोषीस सोसून, आम्हाला मनापासून साथ दिली आहे. कार्यकर्त्यांची जेवढी निष्ठा आमच्याबाबत आहेत त्यापेक्षा काकणभर जास्त आमचीही निष्ठा कार्यकर्त्यांबरोबर आहे. कार्यकर्ते म्हणूजे एक मोठे कुटुंब समजुन आम्ही आजपर्यंत वागलो आहोत. त्यामध्ये कोठेही कमतरता येथुन पुढील काळात राहणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करण्याचा आमचा वसा चालु ठेवू. या सुसंवाद बैठकीतुन आपण एक विचार घेवून आपापल्या स्थानिक पातळीवर कार्यरत रहावे असे आवाहन केले.

यावेळी समृध्दीन जाधव, सयाजी शिंदे, सौ.अर्चनाताई देशमुख, संदिप शिंदे, माजी आमदार सदाशिवराव सकपाळ, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना, येणा-या सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकद उभी करु अश्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठ ल बलशेटवार यांनी भाजपाने प्रसारीत केलेल्या सरल ॲप, नमो ॲप, मोदी ॲट 9 तसेच भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी 9090902024 या क्रमांकावर मिसकॉल करण्याबाबतची माहीती विषद केली.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांनी करताना, जिल्हयात आयटी पार्क, दोन मोठया इंन्डस्ट्रीज, कारखाने यावेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याचा महाराज साहेबांनी जरुर विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. केले. आभार भाजपा महिला आघाडीच्या राज्य कार्यकारीणी सदस्या आणि माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत यांनी मानले. बैठकीचे सुत्रसंचालक संतोषराव कणसे यांनी प्रभावीपणे केले.

​कार्यक्रमास सातारा जावली तालुक्यातुन सुमारे 2000 इतक्या मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र शिंदे, विरेंद्र शिंदे, संदिप पवार, माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज निकम, राजेंद्र ढाणे, बबनराव देवरे, रामदास साळुंखे, सुर्यकांत पडवळ, विजयराव भिलारे, सुभाषराव शेडगे, रोहीणी निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, हैबतबापू नलवडे, सदाशिवराव बागल, बाळासाहेब खरात, सतीश माने, संजय पोतेकर, संजय मोहिते, नलवडे आबा, संजय भंडारी, बाळासाहेब चोरगे, अशोक चांगण, लक्ष्मण कडव, नंदकुमार माने, रणजीत माने, शफी इनामदार, अमोल तांगडे, गौरव माने, संतोष घाडगे, उपस्थित होते.

​खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाषणाच्या वेळी आणि अन्य व्यक्तींच्या मनोगताच्या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ समयोचित घोषणा दिल्या जात होत्या. पावसाच्या हलक्या सरींबरोबर बैठकीचा माहौल उत्साहपूर्ण होता.

Adv