पर्यावरण पूरक गणेशोत्सव / नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवास चालना देनण्यासाठी गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात समिती स्थापन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव / नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळ नवी दिल्ली यांचेकडील मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
तसेच नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करावा व पर्यावरण संरक्षणामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.