यंदा गणेशोस्तव साधेपणाने साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

72
Adv

दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही ‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा जयघोषात निरोप दिलेल्या सर्वांच्याच लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे दोन महिने उरले आहेत. असं असलं तरी यंदा गणेशभक्तांच्या मनामध्ये बाप्पाच्या आगमनाच्या आतुरतेसोबतच कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव होणार का? झाल्यास त्याचे स्वरूप कसे असणार? असे अनेक प्रश्न घोंघावत आहेत. अखेर आज गणेशभक्तांच्या या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळालं असून सरकारने यंदा गणेशोस्तव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी देखील निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलंय. यावेळी मंडळांनी राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नाही असं आश्वासन देखील दिलं आहे.

राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्राचा प्रमुख उस्तव असलेल्या गणेशोस्तवानिमित्ताने दरवर्षी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. मात्र यंदाचे कोरोना संकट पाहता ही गर्दी घाट करणारी ठरू शकते या जाणिवेतून गणेशोस्तव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Adv