हिवाळी अधिवेशना नंतर श्री छ उदयनराजे होणार खासदार?

177
Adv

छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्यामधून सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लोकसभा खासदार म्हणून निवडणून आलेले श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी पक्ष बदलला आणि पोट निवडणूकीला सामोरे गेले. पण त्यांना पराभव स्विकारावा लागल्यानंतर श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या राजकिय कारकिर्दिला काहीसा ब्रेक मिळाला आहे.

यावेळी श्री.छ. उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत असून उदयनराजे समर्थकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
केंद्र व राज्यात सध्या राजकिय परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. केंद्रात एकमेकांशी मैत्रीत्व करणारे राज्यात विरोधक बनले आहेत. तर राज्यात विरोधक मित्र झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्यसभेचे सदस्य निवृत्त होत असून दि २ एप्रिल रोजी राज्यसभेवर खासदार निवडून देण्यासाठी निवडणूक होत आहे.

( 5 दिवसांपूर्वीच दिल्ली येथे दोन केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्याबरोबर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची राजकीय खलबते दिल्ली येथे झाल्याचे समजते)

या निवडीमध्ये सहा सदस्य पक्षीय बलाबल नुसार निवडून येवू शकतात मात्र सातव्या जागेसाठी अपक्षांच्या कुबड्या घेणे याशिवाय गत्यंतर राहिले नाही. भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झालेले व विद्यमान मंत्री रामदास आठवले, संजय काकडे, अमर साबळे, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकूमार धूत, राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड.माजीद मेमन असे सात सदस्य निवृत्त होत आहेत. भाजपमध्ये गेलेले सातारचे माजी खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी भाजप वरिष्ठ नेते अनुकूल झाले असून त्यांचे राजकिय पुर्नवसन भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्रात श्री.छ.भोसले यांच्यामुळे भाजपचे कोमजलेले कमळ पुन्हा फुलेल अशी अपेक्षा भाजप वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे तीन जागांपैकी रामदास आठवले, श्री.छ.उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या यांची नावे चर्चेत येवू लागली आहेत.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाकडून खासदारकीला श्री.छ.भोसले निवडून आले होते. पण त्यांनी विकासाच्या मुद्यावर खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमधून पुन्हा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. हे शल्य त्यांच्यापेक्षा त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ करत होते. सातारा जिल्ह्यात ००७, महाराज, मालक, बच्चन, राजे अशा अनेक उपाध्या लावणारी हजारो वाहने आहेत.

या वाहनचालकांच्या कुटुंबातील मतदारांनी मते दिली असती तरी श्री छ उदयनराजे निवडून आले असते अशी परिस्थिती असताना त्यांचा पराभव होणे याचा अर्थ डाल मै कुछ काला है असे मानले जावू लागले आहे. यावर अनेक कवित्व झाले असले तरी सध्या श्री.छ.भोसले यांना राज्यसभेवर संधी देवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा असे राजकिय विरोधकांनाही वाटू लागले आहे.

Adv