मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

75
Adv

केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी यांची आज सकाळी नवी दिल्ली येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जवळजवळ 325 तालुक्यात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आज केंद्र सरकारला सादर करण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ मदत करावी, अशी विनंती यावेळी केली.

केंद्र सरकारने सुद्धा निरीक्षणासाठी तत्काळ चमू पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. विमा कंपन्यांसोबत बैठक करून केंद्र सरकारने त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत. नियम शिथिल करून शेतकर्‍यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी यावेळी केली. अशी बैठक घेण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले आहे आणि तशा तत्काळ सूचना अधिकार्‍यांना त्यांनी दिल्या.

Adv