भाजपमध्ये जाणारे आघाडीतील तीन आमदार वेटींगवर; धाकधूक वाढली

82
Adv

राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसेचे अनेक मातब्बर नेते भाजप सेनेत दाखल झाले आहेत. तर, आणखी काहीजण वेटींगवर आहेत. यामध्ये पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे तर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपाचे दार ठोठवले आहे.

आज दुपारपर्यंत राज्यात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील या तिन्ही आमदारांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आमदार भारत भालकेंना आमदार परिचारकांचा तीव्र विरोध आहे, तर बबनदादा शिंदेना विजयसिंह मोहिते पाटलांचा मोठा अडसर आजही कायम आहे. तर, तिकडे अक्कलकोटच्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यानी म्हेत्रेना विरोध केला आहे.
या सगळा अडथळयावर तिन्ही आमदार कशी मात करतात याकडेच सोलापूर जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

Adv