महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला आहे, उद्या राज्यपालांना भेटायला जातोय, महायुतीचंच सरकार स्थापन होईल. चंद्रकात पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवलं नाही. सरकार आमचचं येईल यात कसलीही शंका नाही. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पाऊल हे महायुतीच सरकार व्हावं यासाठीच पुढेच जातय”
“राज्यात शिवसेना-भाजप सरकार व्हावं यासाठी जनादेश मिळाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्यासाठी आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडेल. यासाठी मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहोत. त्यावेळी कोणत्या गोष्टीबाबत चर्चा होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार येईल त्यामुळे चिंता करु नका,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.