Tuesday, June 9, 2026
spot_img
Home Maharashtra ‘पोरखेळ म्हणणाऱ्या काकांचा पराभव, संदीपने विधानसभा जिंकली

‘पोरखेळ म्हणणाऱ्या काकांचा पराभव, संदीपने विधानसभा जिंकली

167
Adv

विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले होते. तसेच, विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही, असा टोलाही जयदत्त अण्णांनी लगावला होता. मात्र, संदीप यांनीही आपण लहान पोरं राहिलं नसल्याचं दाखवून दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यात मुसंडी मारली असून परळीनंतर बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी तर बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी विजयश्री खेचून आणली.

Adv