माझे भाग्य आहे की मी उदयनराजेंच्या शेजारी बसलो आहे. मी त्यांचा मोठा चाहता आहे. त्यांना भेटण्यासाठीच मी इथे आलो आहे. इतकी दिवस येथे राष्ट्रावादी जिंकायची पण आता राष्ट्रवाद जिंकेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी प्रचारासाठी साताऱ्यातील पाटण येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हेही मंचावर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळी उदयनराजेंना वाकून नमस्कार केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. येथे आमदार खासदारांसाठी प्रचाराची गरज नाही. इथे मी फक्त उदयनराजेंचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असंही ते म्हणाले.