शिवछत्रपतींच्या शिवस्वराज्यापासून धाडस, धैर्य व नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या साताऱ्यातील घोरपडे कुटुंबीयांविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना आहे. दानशूर वृत्ती, धार्मिक व सामाजिक कार्यात पुढाकार, गोरगरीब व गरजूंच्या मदतीला धावून जाणे या घराण्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. याच कुटुंबातील नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा त्रिवेणी संगम रामभाऊ घोरपडे यांनी साताऱ्याचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक विकास कामे घडून आली. त्यांचे सुपुत्र अशोकदादा घोरपडे व सुनबाई अनिताताई अशोक घोरपडे यांनीही हा वारसा पुढे समृद्ध केला.
शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवाहात सक्रिय झालेल्या या कुटुंबातील सौ.अनिताताई घोरपडे यांनी सातारा नगरपालिकेत नगरसेविका म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. केवळ आपल्या प्रभागातीलच नव्हे तर समस्या घेऊन येणाऱ्या शहरातील प्रत्येक नागरिकाला योग्य दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे. रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत शहरातील सर्व नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घोरपडे दाम्पत्याने केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. या ऊल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सातारा विकास आघाडीचे नेते खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आरोग्य सभापतीपदी सौ. अनिता घोरपडे यांना संधी दिली. शांत, संयमी असे व्यक्तीमत्त्व असलेल्या नेतृत्वास संधी मिळाल्यानंतर त्यांनी सभापतीपदाच्या माध्यमातून सातारकर यांच्या आरोग्याची काळजी घेणारे विविध उपक्रम राबवले.
दरम्यान,कोरोना महामारीच्या काळात अगदी सुरुवातीला कोरोनाबाबत भीतीपोटी संपूर्ण जग ठप्प झाले होते, त्यावेळी घोरपडे दाम्पत्याने पुढे येऊन आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्यात पुढाकार घेतला तसेच कोरोनाबाबतची नेमकी माहिती सर्वांना समजावी म्हणून जनजागृतीही केली. गरजू रुग्णांसाठी गोळ्या,औषधे, ऑक्सिजन मशीन पुरविण्यासह कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटरच्या सुविधेबाबत स्वतः ग्राउंडवर उतरून सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.तसेच नागरिकांसाठी अन्नधान्य, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली. कोरोना काळातील घोरपडे दाम्पत्यांचे काम अत्यंत स्तुत्य असून खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला. प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरात नवी दिशा देणारे समाजसेवी दांपत्य म्हणून सौ. व श्री. घोरपडे यांचा उल्लेख केला जातो. परिसरातील महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांना बचतीची सवय लागावी या हेतूने महिला सहाय्यता बचत गट स्थापन करण्यात सौ.घोरपडे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शहर समृद्धी योजना व अन्य विविध शासकीय योजना राबविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
खऱ्या अर्थाने आदर्श नगरसेविका व समाजसेविका ही ओळख असणाऱ्या सौ. अनिताताई घोरपडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तसेच आजवरच्या उत्कृष्ट समाजसेवेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातही उत्तमोत्तम संधी मिळावी या सदिच्छेसह त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना.!