Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार

साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार

490
Adv

ऐतिहासिक सातारा नगरीत आपणा सर्वांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही याची उणिव भासत होती. या करीता आम्ही शासनाकडे जरुर तो पाठपुरावा केला तसेच या नियोजित स्मारकाच्या दैनंदिन देखभाल व वज राखण्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा या नावाने रितसर नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे संस्थेचे नोंदणी पत्र प्राप्त झाले त्याच दरम्यान राज्य शासनाने या स्मारकासाठी रुपये 2कोटी(पहिला टप्पा) इतका निधी देखील मंजूर झाला ही अत्यानंदाची बाब आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि आपणा सर्वांचे जाजल्य स्फूर्तीदायी व्यक्तीमत्व म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना उभा देश ओळखतो. साता-यामध्ये त्यांनी त्याकाळी केलेल्या अवर्णनीय बाबी खुप मोठया संख्येने आहेत. असे असून सुध्दा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साता-या मध्ये नाही याची उणिव आमच्यासह सर्वांनाच भासत होती. ऐतिहासिक व्यक्तींचे स्मारक होण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तरी सुध्दा काहीही झाले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक साताऱ्या मध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातुन उभे करण्याचा आम्ही संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि चालु आहे.

यासाठी प्रथम सातारा शहरातील सर्वसमावेश व्यक्तींची एक संस्था स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा या नावाने आम्ही स्थापन केली. यामध्ये जेष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक समितीचे उपाध्यक्ष हरिष पाटणे यांना उपाध्यक्ष तसेच गोडोलीचे विलासनाना शिंदे यांची सचिव म्हणून सर्वांनुमते नुियक्ती करण्यात आली आहे.सर्वांचा आग्रह झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्विकारले आहे.या संस्थेमध्येसर्वश्री दत्तात्रय बनकर,जेष्ठ पत्रकार शरद काटकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, माजी पं.स. सदस्य संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोरतात्या शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, ईर्शाद बागवान,सुजित जाधव, सचिन साळुंखे,अमोलभाऊ तांगडे, या व्यक्तींचा समावेश आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभुन दिसेल असा पुतळा आणि स्मारकउभारणी करताना तसेच त्यानंतर त्याची वज राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन होणार आहे. त्यासाठी
नुकताच रुपये 2 कोटींचा पहिला टप्यातील निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे.यासाठी लागेल तितका निधी मंजूर केला जाणार आहे.लवकरच प्रतिष्ठानची बैठक बोलावण्यात येणार आहे.त्या बैठकीत विशेष निमंत्रितांनाही बोलावण्यात येणार आहे. या स्मारकाचा आराखडा, नकाशा तसेच अन्य बाबींविषयी या बैठकीत विचारविमर्श करण्यात येणार असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही नगरपरिषदेच्या माध्यमातुन करण्यात
येईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv