सातारा शहरातील विकास कामांसाठी तीन कोटीचा निधी

282
Adv

सातारा शहरांमध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्यासाठी केंद्र व राज्य यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. सातारा शहराच्या विकासासाठी सातारा विकास आघाडी कटीबद्ध आहे तथापि जनतेच्या विश्वासास पात्र ठरली आहे याचे समाधान आहे असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे

सातारा नगरपरिषद हद्दीतील राधिका रोड शिंदे बंगल्यासमोरील ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण करणे बुधवार नाका परिसरातील कब्रस्तान समोरील ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण करणे या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचा उपलब्ध झाला आहे . शुक्रवार पेठेतील कुंभार घर ते तारळे घर येथे ओढ्या लगेच संरक्षक भिंत बांधणे 50 लाख रुपये आणि सातारा नगर परिषदेच्या हद्दीत इलेक्ट्रिक डेकोरेटिंग पोल, रोप लाईट बसवणे, डिजिटल बोर्ड लावणे यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर झाले आहे असा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे

सातारा शहर पेन्शनरांचे गाव असलेली ओळख असून विकसित शहर म्हणून त्याचा विस्तार होत आहे . काही विकास कामांचे प्रस्ताव आम्ही नगरपालिकेकडे सादर केले होते . सातारा शहराचे सुशोभीकरण या निधीतून केले जाणार आहे मोळाच्या ओढ्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते . म्हणून काही ओढ्यांच्या पुलाचे रुंदीकरण केले जाणार आहे जनसामान्यांच्या हितासाठी झटणारी सातारा विकास आखाडी अखंड कार्यरत आहे व आम्ही सार्वजनिक लोक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत नगरपालिकेत प्रशासक राजवट असली तरी व्यक्तिगत पातळीवरील पाठपुराव्यामुळे विविध विकासकामे मंजूर होत आहेत .लोकांसाठी राबणारी सातारा विकास आघाडी संपूर्ण सातारकरांच्या मनामनात आहे असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे

Adv