मध्यप्रदेशात आ. गोरे यांच्याबद्दल ”’जय हो”’ चा नारा

647
Adv

( अजित जगताप)
सातारा दि: कर्तबगार व्यक्तीला कोणतीही सीमा नसते. जहा हम खडे होते है,,, वहा से लाईन सुरू होती है ….! असे फिल्मी डायलॉग आहे .तरी प्रत्यक्षात मात्र राजकारणामध्ये यशस्वी ठरलेले सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणचे बोराटवाडी सुपुत्र आ. जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळेच आगामी मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटन विधानसभा मतदारसंघासाठी आ. जयकुमार गोरे प्रवासी विधायक म्हणून सभा गाजवत आहेत. त्यांच्या जय हो च्या नाऱ्याने पाटन विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
केंद्र व राज्य सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना लोकांपर्यंत राबवले आहेत अनेक विकासाची कामे गतीने होत असून जगभरात भारत देशाचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जात आहे. त्यामुळे या वर्षी मध्य प्रदेशात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी खूप मोठी मोर्चा बांधणी भाजप नेते गण करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाने मझोरी पश्चिम मंडळ या प्रभागात सर्व भाजप कार्यकर्त्यांचे बैठका व निवडणूक आखरी सुरू केलेली आहे. यासाठी मार्गदर्शन म्हणून माण – खटाव भाजपचे हाट्रिक आ. .जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याला न भूतो न भविष्य असा उदंड प्रतिसाद लाभत असल्याची माहिती स्थानिक भाजप नेते अभिमानाने देत आहेत
मझोली मतदार संघात नगरपरिषद येत आहे. तसेच मुख्यमंत्री लाडली बहीण संमेलन कतंगी जबलपूर या ठिकाणी झाले. या कार्यक्रमाला भाजप प्रवासी विधायक म्हणून आ. जयकुमार गोरे उपस्थित होते. जबलपूर लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येत असून चार भाजपकडे तर चार राष्ट्रीय काँग्रेसकडे आमदार आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे यांनी झंझावात दौरा केला आहे. त्याचा निश्चित फायदा भाजपला होणार आहे .
मध्य प्रदेश मध्ये २३० आमदार असून ३५ अनुसूचित जाती व ४७ अनुसूचित जमातीचे आमदार निवडून द्यायचे आहेत. यासाठी सर्व भाजप नेते गण व शिवराज चौहान परिश्रम घेत आहेत. त्यांना आ. जयकुमार गोरे, भाजप पाटन आ.अजय विश्र्नोई यांची साथ लाभत आहे. त्यामुळे पाटन विधानसभा मदारसंघातील भाजप वर्चस्व प्रस्थापित राहणार आहे. असे दिसते.
दरम्यान, पंधरा महिन्यात मध्य प्रदेशात भाजपने सत्तांतर घडवून आणले आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही सत्ता मिळविण्यासाठी चांगलाच चंग बांधला आहे. पण, पाटन विधानसभा मदारसंघातील मतदार भाजप सोबत असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. आ जयकुमार गोरे यांच्या प्रवासी विधायक दौऱ्यामध्ये करिश्मा घडवून आणला आहे.त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला असून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रात जशा पद्धतीने ट्रिपल इंजन सरकार आहे. तशा पद्धतीने विकासही ट्रिपल वेगाने होत असल्याचे संकेत आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात दिली आहे. मध्यप्रदेश विकास होण्यासाठी भाजप शिवाय कोणताही पर्याय नाही .असे ही आ जयकुमार गोरे यांनी मेळाव्यातील भाषणात स्पष्ट केले.
माण -खटावच्या दुष्काळी भागातील नेत्यांनी थेट राष्ट्रीय पातळीवर राजकारणामध्ये उडी घेतल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आ गोरे यांची राजकीय दृष्ट्या प्रगती व्हावी अशा भावना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव शिंदे,शेखर पाटोळे, काका बनसोडे, धंनजय चव्हाण व रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश, संतोष भंडारे,विक्रम रोमण, आकाश जाधव,अमोल गोडसे , जयवंतराव पाटील, प्रदीप शेटे,अनिल माळी यांनी व्यक्त केली आहे.

Adv