कर्पूरगौरम करूणावतारम.. असे म्हणत शिवभक्तांनी साजरा केला श्रावणी सोमवार.

168
Adv

सातारा .. कर्पूर गौरम करूणावतारम संसार सारं भुजगेंद्र हारम ..असे म्हणत सातारा जिल्ह्यातील लाखो शिवभक्तांनी पवित्र अशा श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारचे व्रत पूजा आणि उपवास करत मोठ्या भक्ती भावाने आणि धार्मिक वातावरणात साजरे केले सातारा शहरातील शिव मंदिरांमध्ये रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती .

कोटेश्वर मंदिरात यानिमित्त फुलांची विशेष सजावट व आरास करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा झाल्यानंतर भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता.लांबूनच शिवपिंडीचे भाविकांनी दर्शन घेत शिवामूठ वाहिली आणि दर्शन घेतले.
मंदिर परिसरात पांढरी फुले, बेलपत्र ,नारळ तसेच पूजा साहित्य विक्रीसाठी स्टॉल द्वारे लावण्यात आले होते.सातारा शहर परिसरातील खिंडीतील गणपती श्री कुरणेश्वर देवस्थान, शुक्रवार पेठेतील श्री कोटेश्वर मंदिर, सातारा शहरा नजीकच्या संगम माहुली येथील काशी विश्वनाथ मंदिर तसेच शहरातील अमृतेश्वर, बहुलेश्वर, गणकेश्वर ,विश्वेश्वर तसेच कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारचे अवचित्य साधून मंदिरांमध्ये पहाटे लवकरच रुद्राभिषेक, महापूजा ,महाआरती करण्यात आली त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये रांगा लावल्या होत्या .रात्री उशिरापर्यंत गर्दीचा उच्चांक वाढतच होता. रात्री उशिरा कर्पूर आरतीने या श्रावण सोमवारची सांगता करत भाविकांनी उपवासाचे पारणे सोडले.

Adv