Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City विकास कामांच्या अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही खा. उदयनराजे

विकास कामांच्या अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही खा. उदयनराजे

312
Adv

सातारा जिल्ह्यातील विकास कामे आम्ही लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार सुचवित असतो या कामांची अनावश्‍यक अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बिलकुल मुलाहिजा ठेवला जाणार नाही लोकांच्या हितासाठी असणारी विकास कामे वेळेत मार्गी लागायला हवेत अशा स्पष्ट कानपिचक्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे षि विकास अधिकारी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा संधारण अधिकारी लेखा अधिकारी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग सिंचन विभागाचे सर्व अभियंता यावेळी उपस्थित होते

या बैठकीत मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले विकास कामे ही लोकांच्या गरजेप्रमाणे आणि मागणीनुसार सुचवली जातात ती कामे कोणता प्रशासकीय अधिकारी करतो हे महत्त्वाचे नाही सुचवलेली विकास कामे ही वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत या कामांमध्ये अनावश्यक अडवणूक करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांचा अजिबात मुलाहिजा ठेवला जाणार नाही लोकहिताची कामे मार्गी लागली पाहिजेत असा सज्जड इशारा श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी बैठकीत दिला

प्रशासकीय यंत्रणांनी केवळ कामाच्या काही तांत्रिक समस्या असतील अशी कामे सोडून तातडीने प्रस्तावित कामे करणे अपेक्षित आहे परंतु काही वेळा कामे कोणी सुचविली यावरून प्रशासकीय यंत्रणा कामांच्या नस्ती हाताळत असतात ही बाब प्रशासन विभागाला शोभणार नाही अशा मानसिकतेमुळे अंतिमतः समाजाचे मोठे नुकसान होत असते लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या कामांबाबत त्या-त्या प्रशासक विभागांनी आपली जबाबदारी पूर्ण करून कामांना गती द्यावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या या बैठकीचे प्रास्ताविक आणि स्वागत बाळासाहेब ननावरे यांनी केले तर सुनील काटकर यांनी आभार मानले

Adv