Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

385
Adv

मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे बनवून त्यांची जमीन लाटण्याचा प्रकार भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. याच पार्श्वभूमीवर, आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकाऱ्यांसह सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अजय बन्सल जी यांची भेट घेऊन भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी दिली यावेळी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष Ravikant Varpe तसेच इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल असून ते स्वतः फरार आहेत. त्यामुळे त्यांची अटक हा मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेचा प्रश्न बनलेला आहे. राज्यातील मागासवर्गीयांवर अशाप्रकारचा कोणताही अत्याचार महाविकास आघाडीचे सरकार होऊ देणार नाही. असा ठाम विश्वास ही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला

Adv