Friday, August 14, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City २० मे रोजी सुशांत मोरेंचे आत्मक्लेश आंदोलन

२० मे रोजी सुशांत मोरेंचे आत्मक्लेश आंदोलन

107
Adv

सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक हे लोकशाहीचा गळा घोटत असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या व्यक्ती स्वतंत्र्याचा अपमान करत आहेत. सभा चालू असताना नागरिकांना बोलता येत नाही हे जरी खरे असले तरी फौंजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील ही हुकूमशाहीची भाषा योग्य नाही. मुख्याधिकारी यांनी सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनू नये. असे पत्रक काढून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हे पत्र त्यांनी मागे घ्यावे आणि सातारकर नागरिकांची माफी मागावी. अन्यथा सातारकार नागरिकांचा अपमान केला म्हणून त्यांचे विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यसमोर दिनांक २० मे रोजी सकाळी १० वाजता
आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दीला आहे. सर्व नागरिकांनी या हुकूमशाही ला विरोध करण्यासाठी एकत्र यावे अशी देखील विनंती सुशांत मोरे यांनी केली आहे.

Adv