Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात (सोमवारी) भाजपचे शक्तीप्रदर्शन

साताऱ्यात (सोमवारी) भाजपचे शक्तीप्रदर्शन

134
Adv

सातारा नगर पालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दि. १ रोजी सकाळी ८.३० वाजता खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी मैदान ते पोवई नाका अशी भव्य पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ८.३० वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पदयात्रेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आपल्या हजारो समर्थकांसह सहभागी होणार आहेत. पदयात्रा मोती चौक मार्गे खालच्या रस्त्याने पोवई नाका येथे जाणार आहे. शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून दोन्ही राजे नागरिकांना संबोधित करणार आहेत. या भव्य पदयात्रेत भाजपचे सर्व पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व माजी पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, दोन्ही राजांचे सर्व कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Adv