Tuesday, September 8, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

567
Adv

सातारा शहरातील अतिक्रमणांविरोधातील कारवाईला आता वेग आला असून, शाहूपुरी चौकातील अतिक्रमणधारकांना सातारा पालिकेने थेट २४ तासांत अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शाहूपुरी परिसरातील अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचा हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समर्थ मंदिर आणि गोडोली परिसरातील अतिक्रमण कारवाईनंतर आता सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव मोर्चा शाहूपुरीकडे वळला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांच्या प्रश्नाला आता प्रशासनाने हात घातला आहे.
विशेष म्हणजे, शाहूपुरीतील कारवाईच्या निमित्ताने ‘पांढऱ्या सदऱ्यातील साहेबां’च्या दबावाला प्रशासनाने दणका दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पालिकेचे निर्णय बाहेरून नव्हे, तर पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतूनच होतात, हे या कारवाईमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
आता नोटिसा बजावल्यानंतर पुढील २४ तासांत संबंधित अतिक्रमणे स्वतःहून हटवली जातात की पालिकेच्या पथकाकडून थेट कारवाई केली जाते, याकडे शाहूपुरीसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
समर्थ मंदिर, गोडोलीनंतर शाहूपुरी… अतिक्रमण हटाव मोहिमेचा पुढचा निशाणा कोणता? हा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.

Adv