Monday, August 17, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District म्हसवड इंडस्ट्रियल कॉरिडॉरला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट

म्हसवड इंडस्ट्रियल कॉरिडॉरला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट

24
Adv

दिल्ली : महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार मा. श्री. पीयूष गोयल यांची आज दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी वाणिज्य व उद्योग विभागाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
विशेषतः म्हसवड येथे नियोजित इंडस्ट्रियल कॉरिडॉर तसेच एमआयडीसीच्या उर्वरित प्रक्रियेला गती देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील विविध विकास प्रकल्पांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकल्पांच्या अडचणी व आवश्यक बाबींचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. केंद्र शासनाच्या स्तरावर आवश्यक सहकार्य, समन्वय आणि उपाययोजना करून या प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
म्हसवडसह सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी केंद्राच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यावर यावेळी भर देण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
म्हसवड येथील प्रस्तावित इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि एमआयडीसीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळाल्यास सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Adv