Sunday, November 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District शरद पवार गटासाठी मकरंद आबा शब्द पाळणार का?

शरद पवार गटासाठी मकरंद आबा शब्द पाळणार का?

141
Adv

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात नामदार मकरंद पाटील यांनी उदय उंडाळकर यांना दिलेला अजितदादांचा शब्द पाळत राजकीय विश्वासाला महत्त्व दिले. मात्र, आता हाच अजितदादांचा शब्द जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेतील शब्द पाळणारे मकरंद आबा जिल्हा परिषदेच्या राजकारणातही शरद पवार गटाला दिलेला शब्द पाळणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
अजित पवार यांच्या बैठकीनंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आणि शरद पवार गटाने एकत्र येत जिल्हा परिषद निवडणूक लढवली. दोन्ही गटांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात यशही मिळवले. या एकत्रित राजकीय लढाईमागे अजितदादांचा शब्द आणि दोन्ही गटांतील समन्वय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील यशानंतर आता सत्तेतील वाट्याची अपेक्षा शरद पवार गटाकडून व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्य निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अजितदादांनी दिलेला शब्द लक्षात घेऊन मंत्री मकरंद पाटील शरद पवार गटाला एक स्वीकृत जिल्हा परिषद सदस्यपद देणार का? की निवडणुकीपुरतीच दोन्ही राष्ट्रवादींची एकजूट मर्यादित राहणार? जिल्हा बँकेतील शब्द पाळल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या राजकारणात मकरंद आबा कोणती भूमिका घेतात, यावर दोन्ही राष्ट्रवादींच्या पुढील राजकीय संबंधांची दिशा ठरणार आहे.

Adv