संग्राम बर्गे ; विकासाचे स्वप्न पाहणारं नेतृत्व

423
Adv

आपला भाग-शहर-जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून हा युवक निस्वार्थी भाव व सेवाभावी वृत्तीने सतत कार्यप्रवण आहे. युवा पिढीविषयीच्या तळमळीतून त्याने संघटन उभे केले; त्यांच्यातील उर्जेला विधायकतेचे रुप दिले. सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्‍नावर विशेषत: सामान्यातील सामान्याला आरोग्य विम्याचे संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी तो झटत आहे. संग्राम बर्गे त्या युवकाचे नाव! आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द …

सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन या गावच्या मातीतून आलेले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मुशीत घडलेले युवा नेतृत्व म्हणजे आपल्या विलासपूरमधील संग्राम बर्गे ! मुळ गाव चिंचणेर असले तरी केसरकर पेठेत त्यांचे बालपण गेले. बाल हनुमान मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवातील उत्साही कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. चांगली मित्रमंडळी मिळत गेल्याने त्यांतून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर संग्राम बर्गे यांचा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसशी संपर्क आला. लोकशाही प्रक्रीया जवळून समजून घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर निवडणूकांचा अनुभव घेतला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपर्कात आल्याने उदयनराजेंनी गुण हेरून संग्राम बर्गे यांच्यावर नॅशनल युथ काँग्रेस (एनएसयुआय) मध्ये काम करण्याची जबाबदारी टाकली.

‘एनएसयुआय’मधील कामगिरी

‘एनएसयुआय’चे अध्यक्षपद हे तसे कमी वयात जबाबदारीचे पद. परंतू त्यालाही संग्राम बर्गे यांनी तळमळीने काम करुन न्याय दिला. युवा चळवळीतील संघटन कौशल्याचा अनुभव पुढे त्यांना पुढील सामाजिक वाटचालीत उपयोगी ठरला. विद्यार्थ्यांविषयी त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या प्रश्‍नांना बऱ्याच अंशी यश आले. २००६ ते २०१० या कालावधील राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसची जिल्ह्याची धूरा संग्राम बर्गे यांनी वाहिली. २००६-०७ या वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने इयत्ता ११ व १२ च्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालय प्रवेशाचा प्रश्‍न चिघळला होता. संग्राम यांनी याप्रश्‍न लक्ष घातले. विना अनुदानित तुकड्यांमधील प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागणार होती. ग्रामीण भागातून येणाऱ्या व आर्थिक दुर्बल कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना हे चोचले परवडणारे नव्हते. शिक्षण तर घेतले पाहिजे, पण विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी पैसा कुठून आणायचा असा पेच विद्यार्थ्यांपुढे होता. संघटनेच्या माध्यमातून संग्राम बर्गे यांनी हा प्रश्‍न केवळ उचलून धरला नव्हे तर निर्णयाच्या टोकापर्यंत पाठपूरावाही केला. सर्वपक्षीय आंदोलन झाले, महाविद्यालयीन कामकाज बंद ठेवावे लागले. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची घेतलेली भूमिका सर्वांना पटली आणि अखेर या पेचातून मार्ग निघाला. आर्थिक दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांचा अनुदानित तुकड्यांमधील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.

सामाजिक उपक्रमात सहभाग

विलासपूरमधील राधिका नगरमध्ये २० वर्षांपुर्वी रहायला आल्यानंतर बाल हनुमान मंडळाचा संपर्क कमी झाला तरी त्यांच्यातील उर्मी गप्प् बसण्याची नव्हती. राधिक नगरमधील लोकसेवा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपल्या भागातील विविध सामाजिक उपक्रमात संग्राम यांचा सहभाग वाढला. सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण आदी प्रकारचे उपक्रम राबवून त्यांनी लोकमान्यांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या आदर्शांवर पाऊले टाकत मार्गक्रमण सुरूच ठेवले.

लोकविश्‍वास हेच संचित

निस्वार्थी सेवाभाव या अंगभूत गुणांमुळे गेल्या २० वर्षांत त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित झाले. आपल्या कार्यातून संपादन केलेला लोकविश्‍वास हेच संग्राम बर्गे यांचे संचित म्हणावे लागेल. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या माध्यमातून विलासपूर, गोडोली या भागाचा समतोल विकास साधण्याची त्यांची भूमिका पहायला मिळाली. काही लोक समाजसेवेचा आव आणतात, परंतू त्यांचा व्यवसाय काय, उदरनिर्वाह कशावर चालतो हेच कळत नाही. मी मुद्दाम नमूद करु इच्छितो की श्री मंगलमूर्ती बिल्डर्स या फर्मच्या माध्यमातून कन्सट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या व्यवसायात संग्राम बर्गे स्थिरस्थावर आहेत. समाजकारण-राजकारण हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन नाही, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळेच लोकांचा त्याच्या कार्यावर विश्‍वास आहे.

कोविड काळातील कामगिरी

या हाताने केलेली मदत त्या हाताला कळता कामा नये, ही संग्राम बर्गे यांच्या कामाची पध्दती मला कोविड काळात जवळून अनुभवायला मिळाली. कोविड डिफेंडर ग्रुपच्या माध्यमातून संग्राम यांनी केलेल्या मदतकार्याला तोड नाही. पहिल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांचे आपापल्या प्रदेशाकडे निघालेले जथ्थेच्या जथ्थे माहुली रेल्वेस्टेशनवर तात्कळत रात्री काढत होते. आपला एक देशबांधव गैरसोईमुळे आभाळ सहन करत आहे. त्याला माणूसकीच्या भावनेतून शक्य ती मदत करण्याच्या उद्देशाने ‘कोविड डिफेंडर ग्रुप’ धावून गेला. ‘कोविड डिफेंडर’ हा कोणताही राजकीय चेहरा नसलेला समुह. संग्राम बर्गे, ॲड. विनीत पाटील, शशिकांत पवार, सादिक शेख अशा काही संवेदनशिल लोकांनी एकत्र येऊन रचनात्मक काम उभे केले. या ग्रुपच्या उभारणीत संग्राम बर्गे यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून ते जेवण, अंथरुण-पांघरुणाची सोय इथपर्यंत हे कार्यकर्ते रेल्वेस्टेशनवर राबले. फूड पॅकेट, पिण्याचे पाणी, रोजीरोटी थांबल्याने उपासमारीची भिती असलेल्या कुटुंबांना शिधा वाटप, गंभिर रुग्णांना रुग्णवाहिका- रुग्णालयात बेड – प्लाझा, ऑक्सिजन मशिन उपलब्ध करुन देणे. तुटवडा असलेली औषधे/ इंजक्शनस्‌ मिळवून देणे अशा विविध पातळ्यांवर हा ग्रुप प्रशासनाच्या हातात हात घालून; प्रसंगी प्रशासनाशी संघर्षाची भूमिका घेऊन लढला. ‘हे माझ्या एकट्याचे नव्हे तर कोविड डिफेन्डर ग्रुपचे सामूहिक यश आहे,’ असे संग्राम बर्गे विनयाने बोलताना मी अनेकदा ऐकले आहे.

युवा शक्तीला आकार

‘कमी तिथं आम्ही’ या सामाजिक भावनेतून संग्राम बर्गे यांच्या नेतृत्वाखाली युवा शक्ती फौंडेशनची स्थापना २०१० मध्ये झाली. युवकांना संघटीत करुन निस्वार्थी, निर्व्यसनी समाज निर्मिती या हेतूने संघटनेचे सामाजिक कार्य जोमात सुरू झाले. अर्थात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद कायम या फौंडेशनला लाभले. क्रिडा स्पर्धा, आरोग्य शिबीरांचे आयोजन या माध्यमातून युवा शक्तीला विधायक रुप देण्याचा प्रयत्न झाला. साताऱ्यात नुकताच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला ‘इनोव्हेटीव्ह सातारा’ हा खासदार उदयनराजे यांचा युवा संवादाचा कार्यक्रम युवा शक्ती फौंडेशनच्या कार्याचा एक भाग आहे. नावं अनेकजण ठेवतात, परंतू युवकांच्या मनातील आशा-अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नांना मुर्तस्वरुप देण्याचा प्रयत्न हा एक यशस्वी प्रयोग म्हणता येईल.

तरुणांना न्याय देण्याची भूमिका

क्षेत्र कोणतेही असो विधायक आणि विकासात्मक काम उभे राहिले पाहिजे. तरुणांना न्याय देण्याची भूमिका रहावी. वंचित घटकांना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, असाच संग्राम बर्गे यांचा मनोदय त्यांच्या वागण्या-बोलण्यातून पहायला मिळतो. सार्वजनिक आरोग्य, बागबगिचे आदी नागरी सुविधांच्या प्रश्‍नावर काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे. सर्वसामान्य माणसासाठी आरोग्य विमा ही महत्त्वाची गोष्ट आहे, तो उतरवला गेलाच पाहिजे, याबाबत संग्राम बर्गे आग्रही आहेत. त्यांचे हे सर्व मनोदय, संकल्प तडीस जावोत, याच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!🎂🌹

Adv