भाजपच्या जल्लोषावेळी चमको पदाधिकारी गायप

295
Adv

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये भाजपची सत्ता आल्याने सातारा जिल्हा भाजपच्या वतीने सातारा शहरात पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा स्तरावरील चमको पदाधिकारी गायब असल्याची चर्चा जोरदार रंगली होती याच जल्लोषावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले असते तर हेच चमको पदाधिकारी आज पुढे पुढे दिसले असते व निष्ठावंत भाजप पदाधिकारी हे एका कोपऱ्यात दिसून आले असते येणाऱ्या निवडणुकीत जर असे चमको पदाधिकारी लुडबुड करत राहिले तर भारतीय जनता पार्टीला नक्कीच निवडणूक जड जाणार हे मात्र नक्की

मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यात भाजपा ची सत्ता आल्या बद्दल जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शना खाली आणि प्रमुख उपस्थितीत सातारा शहरातील मोती चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी सातारकरांना सातारी कंदी पेढे वाटून,फटाके वाजवून आनंदोस्त्व साजरा केला.

सर्वसामान्य नागरिकांना सर्व माहिती वर्तमान पत्र, tv चॅनल,युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया वरून योग्य पद्धतीने पोचवून महत्वाची सेवा करत असल्या बद्दल उपस्थित पत्रकारांना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पेढा भरवून अभिनंदन केले

जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी संबोधन करताना मा.नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकानं झालेला लाभ यामुळेच हे यश प्राप्त झाले. तीन महत्त्वाच्या राज्यात भाजप ची बहुमताची सत्ता आली आणि तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार निवडून येवून जनाधार वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्या लाभ मिळवून देण्याचे काम अहोरात्र केले. त्यामुळे कुणीही किती वल्गना केल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कितीही नावे ठेवली तरीही हे सरकार सर्व जाती धर्मा साठी काम करत आहे.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत याबद्दल लोकांना पूर्ण खात्री आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानंमुळे सातारा व माढा लोकसभेचे दोन्ही खासदार आणि मित्र पक्षासहित आठ ही आमदार महायुतीचे होतील.महाराष्ट्रात ४५ खासदार २५० आमदार हे महायुतीचे होवून लोकसभेमध्ये ४०० च्या वर खासदार निवडून येवून पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला.

Adv