शशिकांत शिंदे यांचे उद्या राजकीय शक्ती प्रदर्शन

184
Adv

राजकीय दृष्ट्या आमदार शशिकांत शिंदे यांना अडकवून मुंबई बाजार समितीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या आगमनाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली असून उद्या आमदार शशिकांत शिंदे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

मुंबई बाजार समितीच्या कथीत शौचालय घोटाळा प्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांना बरेच दिवस मुंबईत राहावे लागले या कथीत घोटाळ्याप्रकरणी आमदार शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यानंतर प्रथमच आमदार शशिकांत शिंदे जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर शशिकांत शिंदे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे खासदार शरद पवार व आमदार शशिकांत शिंदे हे पुणे ते सातारा एकाच गाडीतून जिल्ह्यात येत असून या दोन नेत्यांच्या राजकीय भूमिकेकडे ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

उद्या तीन डिसेंबर रोजी शरद पवार सातारा जिल्ह्यावर येत असून 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पवार साहेबांचे आगमन होणार असून त्यांच्या समोरच शशिकांत शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे नक्की उद्या खासदार शरद पवार साहेब व आमदार शशिकांत शिंदे काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

Adv