राजवाडा चौपाटीच्या वाढलेल्या अतिक्रमणामुळे चक्क लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच होतोय खेळ खंडोबा पालिका प्रशासनाने हस्तक्षेप करावा सर्वसामान्यांची मागणी
राजवाडा चौपाटीच्या वाढलेल्या गाड्यांच्या अतिक्रमणामुळे ऐतिहासिक राजवाड्याचे सौंदर्य झाकले गेले असून चक्क लोकप्रतिनिधी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण ट्रॅफिक जाम होऊन खेळखंडोबा होत असल्याचे दिसून येते यावर आता पालिका प्रशासनाने राजवाडी चौपाटी धारकांना नियमाली देऊन ऐतिहासिक राजवाड्याला पडलेला वेढा कमी करावा अशी मागणी साताऱ्यातील नागरिक करत आहे
सातारा पालिकेच्या वाहतूक विभागातील गाड्यांची ये जा या रस्त्यावरून होत असते दुर्दैवाने साताऱ्यात कुठे आग लागली तर अग्निशामक दलाची गाडीला ही जायला जागा नसते त्याला कारण ही राजवाडा चौपाटी येथे वाढलेली अतिक्रमण व वाहतूक कोंडी असून प्रत्येक राजवाडा चौपाटी वरील गाड्यांपुढे आता टेबल खुर्ची आल्याने अजूनच राजवाडा येथील सौंदर्याचे विद्रूपिकरण झालेले दिसून येते यावर पालिका प्रशासनाने तोडगा कडून चौपटी धारकांना नियमावलीत राहून व्यवसाय करण्यात सूट द्यावी अशी मागणी सातारा जोर धूर लागली आहे