शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आ मकरंद पाटील यांचा वाढदिवस साजरा

252
Adv

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस शरद पवार गटाच्या काही निवडक पदाधिकारी यांच्याकडून साजरा करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत कोर्टामध्येही या संदर्भात सुनावणी चालू आहे सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे दोन गट असून आता दस्तूर खुद्द शरद पवार गटाच्या काही मोजक्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वाई खंडाळा चे आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस साजरा केल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे

राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांनी आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस रिमांड होम येथे केक कापून साजरा केला गेला

Adv