मागण्या मान्य झाल्याने सुशांत मोरे यांचे उपोषण मागे

140
Adv

सातारा : येथील सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी जिल्हयातील विविध अनधिकृत बांधकामासह अनेक मागण्यांसाठी गांधी जयंतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. उपोषण सुरु केल्यानंतर विविध मागण्यांपैकी पाच मागण्यांवर तातडीने निर्णय झाला होता परंतु प्रमुख मागण्यांबाबत काही निर्णय झाला नव्हता अखेर तीन दिवसानंतर महसूल प्रशासनासमवेत बैठक झाली. त्यात महाबळेश्वरसह विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम दोन महिन्यात पाडणे, शहरातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत पोलीस बंदोबस्त घेणे, पालिका आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांची गैरशिस्तीच्या अनुषंगाने अहवाल आयुक्ताकडे सातारा पालिकेचे मुख्याधिका-यांनी पाठवला आहे. तसेच त्याची चौकशी होईपर्यंत मेढा येथे त्याची बदली करण्यात आली आहे. आमदार, खासदार स्टीकरप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचा निर्णय झाला. अनधिकृत बांधकामे लवकरात लवकर कारवाई बाबत आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सुशांत मोरे यांनी उपोषण स्थगित केले असून
जर दोन महिन्यात कारवाई झाली नाही तर हरित न्यायालयात दाद मागणार असल्याचेही श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, सोनगाव, खेड ग्रामस्थ यांच्याहस्ते ज्यूस घेऊन श्री. मोरे यांनी उपोषण स्थगित केले.
येथील सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. यापूर्वी विविध मागण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आली परंतु त्यावर ठोस अशी कोणतीही कार्यवाही न झाल्याने उपोषण सुरु केल्याचे श्री. सुशांत मोरे यांनी सांगितले होते. प्रशासनाने योग्य कार्यवाही करत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा इशाराही श्री. मोरे यांनी दिला होता. उपोषण सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्री. मोरे यांच्या विविध मागण्यांपैकी असलेल्या पाच मागण्यांवर त्वरित कारवाई झाली होती. परंतु प्रमुख मागण्यांबाबत निर्णय न झाल्याने श्री. मोरे यांनी उपोषण सुरुच ठेवले होते. अखेर चौथ्या दिवशी श्री. मोरे यांची निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. त्यामध्ये महाळेश्वर, पाचगणी येथील अनधिकृत बांधकामाबाबत अहवाल घेऊन लवकरच कारवाई करण्यात येईल असे श्री.पाटील यांनी सांगितले. तसेच सातारा नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत सातारा नगरपालिकेने सातारा शहर पोलीस स्टेशनकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पत्र दिले आहे. हा बंदोबस्त मिळताच गोडोली, रविवार पेठ, मल्हार पेठ येथील अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. ज्ञानसागर बालक मंदिर प्राथमिक विद्यालयाबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यालयाला लेखापरीक्षण त्वरित करण्याबाबत तसेच भौतिक सुविधांबाबत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून त्वरित अहवाल मागवला असून तो मिळताच पुढील कार्यवाही करण्याचे पत्र देण्यात आले आहे. सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांच्यावर प्रशासकीय कारवाई तसेच त्यांच्या कार्यकाळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत अधिकार नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर यांना आहेत. त्याअनुषंगाने त्यांच्या गैरशिस्तीचा अहवाल सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पाठवून दिला आहे. तसेच त्यांची मेढा येथे बदलीही करण्यात आली आहे.
श्री. मोरे यांच्या प्रमुख मागण्यांबाबत ठोस कार्यवाही झाल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र जर अनधिकृत बांधकामाबाबत दोन महिन्यात कार्यवाही झाली नाही तर हरित न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Mapro फूड शेंदुरजणे येथील कंपनी चे सांडपाणी चे नमुने प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी घेतले असून पुढील कारवाई करणेचे लेखी आश्वासन दिले आहे.
गुरुवारी सायंकाळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, सोनगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्युस घेऊन श्री. मोरे यांनी उपोषण स्थगित केले.

चौकट
स्टिकरप्रकरणी दिसताक्षण कारवाई होणार
श्री. मोरे यांच्या उपोषणात राज्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्यांच्या नातेवाईकांच्या, कार्यकर्त्यांच्या हिरवे आमदार स्टिकर असणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी ही एक प्रमुख मागणी होती. यासंदर्भात जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना असे वाहन आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पत्र जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे यांनी दिले आहे. त्यामुळे श्री. मोरे यांच्या या मागणीवरही ठोस निर्णय झाला आहे.

चौकट
सागर बडेकर यांची बदली
सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांच्या गैरशिस्तीचा अहवाल सातारा पालिकेचे मुख्याधिकारी बापट यांनी बेलापूर येथील आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत मेढा येथे त्यांची बदलीही करण्यात आली आहे.

Adv