सातारा ५..संपूर्ण जगात आपल्या मिठाईने प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील मोती चौकात गेली चार पिढ्या संपूर्ण जगाला तोंड गोड करणाऱ्या आणि सातारच्या मिठाईचे महत्त्व पटवून देणाऱ्या सुमुख स्वीट्स अर्थात मोदी परिवाराकडून महाराष्ट्र प्रदेशाचे भाजप अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा कंदी पेढे आणि त्यांना कंदी पेढ्याचा हार घालून विशेष सत्कार करण्यात आला .सातारा येथील भेटी प्रसंगी बावनकुळे यांनी घरघर भाजपचे अभियान राबवताना शहरातील व्यापाऱ्यांची संपर्क साधला यावेळी मोती चौकात 52 कुळे यांनी सुमुक स्वीट या सुप्रसिद्ध कंदीपेढा मिठाई शास्त्रज्ञांच्या शोरूम ला भेट दिली यावेळी मोदी परिवाराच्यावतीने सुमुख प्रदीप मोदी ,करिष्मा मोदी, मीना मोदी यांनी बावनकुळे तसेच भाजपाचे जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कंदीपेढा भरवून विशेष स्वागत केले .यावेळी सातारा _जावली तालुक्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी यांचे सह कराडचे अतुल बाबा भोसले ,भाजप आमदार जयकुमार गोरे ,माजी आमदार मदन दादा भोसले , नगरसेवक बाळू उर्फ कल्याण राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती .
तोंडात टाकल्यानंतर कंदीपेढ्याची चवही अतिशय जिभेवर रेंगाळणारी आणि सुमधुर अशी आहे ,कंदी पेढा यापूर्वी खाल्ला होता पण साताऱ्यात आल्यावर कंदीपेढ्याची चव चाखली नाही असे झाले नाही त्यातच मोदी परीवाराने आज हा विशेष भेटीचा योग घडवून आणला.माझा कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार केला, हा कंदीपेढा असंच सर्वांचे तोंड गोड करणारा आहे .भाजपने घर घर अभियान सुरू केले आहे आणि त्याला अतिशय मोठा प्रतिसाद लाभत आहे मी मोदी परिवाराला त्यांच्या या चार पिढ्यांच्या कंदी पेढा व्यवसायाच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो ,अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदी परिवाराला शुभेच्छा दिल्या.