Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District Satara City दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्यावतीने ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरु

दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्यावतीने ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरु

468
Adv

सातारा तालुक्यातील जुन्या पतपेढीपैकी असलेली आणि तंत्रज्ञानात स्पर्धात्मक असलेल्या आर्थिक संस्थांच्याबरोबरीने सुविधा देणा-या दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑपेरिटव्ह संस्थेच्यावतीने ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची सुविधा सुरु करण्यात आली. त्याचा शुभारंभ प्रसिध्द उद्योजक आशिष महाडवाले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन विनोद कुलकर्णी,संचालक आणि मान्यवर उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला अनुसरुन दि गुजराथी संस्थेच्यावतीने क्यू आर कोड, यु.पी.आय. नेट पे या सुविधांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योजक आशिष महाडवाले उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या सुविधेबद्दल गौरवोद्गार काढत असेच नावीन्यूपर्ण सुविधा सभासद, ग्राहकांना द्यावीत ही अपेक्षा व्यक्त केली.  संस्थेचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते संस्थेचे खातेदार रियाज नदाफ, विक्रम बारटक्के, गौरांग शिंदे, प्रदीप बकरे, सौ.प्रतिमा परदेशी, सौ. जांभळे, शुभम कदम यांनी क्यू आर कोडचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संचालक रामचंद्र साठे, वजीर नदाफ, अजित साळुंखे, व्यवस्थापक सतीश घोरपडे, सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

Adv