Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City डॉक्टर संजोग कदम यांच्या कारभाराची चौकशी करा सुशांत मोरे

डॉक्टर संजोग कदम यांच्या कारभाराची चौकशी करा सुशांत मोरे

273
Adv

सातारा सिव्हिल हॉस्पिटल चे सिविल सर्जन यांना पाठीशी घालणारे आठरोग्य उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांच्या कारभाराची ही चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे

माता बाल संगोपन एक्स-रे मशिन दुरुस्ती खोट्या वैद्यकेबिलावर सह्या, दिव्यांगांचे दाखले मुंबई पुणे येथील बैठकांची कारणे देणे, बैठकांना हजर न राहणे अशा अनेक तक्रारी मोरे यांनी निवेदनाद्वारे केल्या होत्या मेडिकल कॉलेज अडीच वर्षांपूर्वी मंजूर होऊन अद्याप त्याचा इमारतीचे काम सुरू झालेले नाही मेडिकल कॉलेजच्या निविदांमध्ये असलेला घोळ उपसंचालक आरोग्य सेवा यांना दिसत आहे तरी ते त्याची पाठ राखण करतात यामुळे आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांचीही तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे

या सर्व मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन वरिष्ठ स्तरावरील चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे सुशांत मोरे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे मात्र ते त्या पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास 15 सप्टेंबर पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात या इशारा त्यांनी दिला आहे

Adv