Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City श्री छ शिवाजीराजे भोसले पंचत्वात विलीन.

श्री छ शिवाजीराजे भोसले पंचत्वात विलीन.

250
Adv

छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री उशिरा सातारा येथील अदालत वाडा येथे आणण्यात आले .त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजी महाराजांचे पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आदालत वाडा येथे गर्दी केली होती राजघराण्याच्या प्रेमापोटी साताऱ्यातील सर्वच व्यावसायिकांनी बुधवारी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवून आपल्या राजाला आदरांजली वाहिली .

सकाळी नऊ ते एक या वेळात अदालत वाडा येथे अंत्यदर्शना साठी मोठी गर्दी झाली होती .मोगऱ्याच्या सुवासिक फुलांनी सजवलेल्या पालखीत राजघराण्याच्या परंपरेनुसार शिवाजी राजे यांचे पार्थिवास पगडी घालण्यात आली होती .अदालत वाडा येथून त्यांची अंत्ययात्रा सुरू होताना खासदार श्री छ उदयनराजे ,आमदार शिवेंद्रराजे, विक्रमसिंहराजे ,सत्यजितराजे, संभाजी राजे यांनी पालखीला खांदा दिला .ही अंत्ययात्रा पुढे सुरू झाली.त्यानंतर त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आले .आणि त्यांची अंत्ययात्रा अदालत वाडा येथून समर्थ मंदिर चौक मार्गे राजवाडा ,मोती चौक, देवी चौक मार्गे राजपथावरून पोवई नाका येथे आली .पोवई नाका येथेही अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारो सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते .छ शिवाजी राजे यांच्या पार्थिवावर संगम माहूली येथे राजघराण्याच्या राजघाट स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

.यावेळी छ शिवाजीराजे यांचे बंधू विजयसिंह राजे ,पुतणे खासदार छ उदयनराजे ,आमदार शिवेंद्रराजे, विक्रमसिंहराजे ,बडोदा येथील सत्यजितराजे गायकवाड, कोल्हापूरचे संभाजी राजे, कन्या वृषालीराजे यांचे सह राजघराण्यातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adv