Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छ उदयनराजे यांच्या संकल्पनेतून साकारलेला महारोजगार मेळावा संपन्न

छ उदयनराजे यांच्या संकल्पनेतून साकारलेला महारोजगार मेळावा संपन्न

653
Adv

सातारा औद्योगिक वसाहतीचा विकास आणि येथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत आहेत.येथील उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी समन्वयक केंद्र म्हणून औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक कार्यालय येथे उभारले जाईल याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या पंधरा दिवसात काढला जाईल अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगार हॉस्पिटल साठी जागा उपलब्ध करून तो प्रश्न त्वरित निकाली काढला जाईल असे सामंत यांनी स्पष्ट करत साताऱ्याच्या उद्योग विश्वाला मोठी भेट दिली

चौकट………
सातबारा नाही दिल बडा होना चाहिए
खा. उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील सर्व सातबाराचे मालक आज या व्यासपीठावर आहेत. पण त्यांना ते आवडत नाही, त्यांच म्हणणं आहे. सातबारा नाही तर दिल बडा होना चाहिय,असे सूचक वक्तव्य संग्राम बर्गे यांनी केले त्याला खासदार उदयनराजेंनी दादही दिली

चौकट………
तरुणांना हृदयापासून शुभेच्छा

मनापासून बाय हार्ट… अजून बिटींग आहे. असं हृदयाला हात लावत सांगत उदयनराजे म्हणाले, ते कशाकरता तर तुमच्या प्रगतीकरता असंच रहावं अन असच तुम्ही मोठं व्हावे, तरुणांनी एवढी मोठी उंची गाठावी की, आमची मान गर्वाने अशी व्हावी की, हे सातारा जिल्ह्यातील तरुण उद्योग व्यवसायात एवढ्या मोठ्या उंचीवर गेले आहेत असं मनाला वाटलं पाहिजे.

सामंत पुढे म्हणाले वेदांता फॉक्स्कॉन सारखे मोठा प्रकल्प यापूर्वीच्या तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेला . मात्र शिंदे फडणवीस सरकारने दावोस येथे एक लाख 37 हजार कोटीचे उद्योग संदर्भातले सामंजस्य करार केलेले आहेत . वेदांता पेक्षाही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणून उद्योग विश्वाला चालना देण्याची मुख्यमंत्र्यांची कल्पना आहे . सुरुवातीच्या काळात उद्योग विभागाला केवळ 70 कोटीची सबसिडी दिली जात होती मात्र गेल्या दहा महिन्यात शिंदे सरकारने 13000 उद्योजकांना चालना देताना सबसिडीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा कार्य विस्तार करून ही योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची नियोजन आहे साताऱ्यातील तरुणांनी नोकरी करता करता व्यवसायाकडे वळून नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी देणारे बनणे गरजेचे आहे याचा विचार करावा तंत्रप्रधान शिक्षण कौशल्य विकास या गोष्टींवर भर देऊन स्वतःला व्यवसायधिष्ठित बनवणे गरजेचे आहे सातारा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे . त्यामुळे पर्यटनाला सुद्धा उद्योग म्हणून संधी देऊन राज्य शासन त्याकरिता विशेष अर्थसहाय्य करण्याच्या तयारीत आहे

साताऱ्यात विविध उद्योगांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रादेशिक उद्योग कार्यालय लवकरच येथे सुरू केले जाणार असून त्यासाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे याबाबतचा अध्यादेश येत्या पंधरा दिवसातच काढला जाईल असे त्यांनी सांगितले याशिवाय साताऱ्यातील एमआयडीसीतील कामगार रुग्णालय आणि कौशल्य केंद्र यासाठी सुद्धा विशेष अर्थसहाय्य करून त्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सामंत यांनी सांगितले कौशल्य केंद्राच्या भूमिपूजनाचा नारळ कधी फोडायचा आहे उदयनराजे तुम्हीच मला सांगा असा सवाल सामंत यांनी केला

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले मी मोठा सातबारा वाला आहे असे म्हटले जाते पण कागदाचे चिठोरे म्हणजे माझा सातबारा नाही साताऱ्याची युवा तरुणाई हा माझा खरा सातबारा आहे तुम्ही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय देणारे वा त्याकरता तंत्र कुशल होऊन आभाळाएवढी उंची गाठा . त्याकरिता लागणारे सर्व सुविधा आणि सहकार्य उद्योग विभाग आणि स्वतः माझ्याकडून केले जाईल याकरता तुम्हाला जलमंदिरची दारे नेहमीच उघडी असतील असे ते म्हणाले सध्याचे युग स्पर्धात्मक आहे तुम्ही वेळ घालवू नका स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी तुम्हाला तंत्रदृष्टीत होऊन खूप सतर्क रहावे लागेल अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली उदय सामंत यांचे स्वागत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय लघुउद्योग पुरस्कार स्पेव्ही फिटनेस इक्विपमेंट, आनंद इंडस्ट्रीज तासवडे ,नायट्रो ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड सातारा व व्यंकटेश ऍग्रो प्रोसेसिंग फलटण यांना देण्यात आले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचे चेक प्रदान करण्यात आले या उमेदवारांना रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी मिळाली त्या पाच उमेदवारांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले रोजगार मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या पुण्याचे युवा हब केंद्राचे संचालक किरण राहणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला

Adv