सातारा पालिकेच्या वतीने शहर हद्दीतील अतिक्रमणकाढण्यासाठी लाखो रुपयाचा ठेका एका ठेकेदाराला दिला असून वर्षानुवर्ष हा ठेकेदार साताऱ्यातील अतिक्रमण काढत नसून या ठेकेदाराला पोसण्याचे काम चालू असल्याचे दिसून येते
सातारा पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाने सातारा शहरहद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी लाखो रुपयांचा वार्षिकठेका काढला असून या ठेकेदारला साताऱ्यातील अतिक्रमण दिसत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे गाडी पालिकेची ठेकापालिकेचा पैसे पालिकेचे तरी या ठेकेदाराला साताऱ्यातील अतिक्रमण दिसत नसल्याने अतिक्रमण निघणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे
सदर ठेकेदार सातारा पालिकेतील अतिक्रमण काढत नसेल तर ठेकेदार पोसण्याचे काम सातारा पालिकेने करू नये सर्वसामान्य नागरिकांच्या कर रुपातून जमा झालेल्या पैशावर हा ठेका चालत असल्याचे दिसून येते साताऱ्यातील अतिक्रमण काढले तर सातारा शहरातील रस्ते नक्कीच मोठे होतील हे मात्र नक्की