खा उदयनराजे भोसले हेच भाजपचे उमेदवार …अतुल भोसले

321
Adv

श्री छ खासदार उदयनराजे भोसले हे मागील वेळी पक्षाच्या चिन्हावर उभे राहून विजयापर्यंत पोचून शकल्‍याची सल भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभेची जागा लढवण्याची संधी मिळाली आणि उमेदवारासाठी शिफारस करण्याची वेळ आली तर खासदार उदयनराजे भोसले हेच भाजपचे उमेदवार असले पाहिजेत,असे माझे मत असल्याचे भाजप नेते अतुल भोसले यांनी सांगितले.

खासदार छ उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे.पक्षाचे संघटन चांगले आहे. भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे भाजपला जागा मिळावी, असे आमचे म्हणणे आहे.

भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना (शिंदे गट) यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून, देशाचा प्रवाह बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व सहकारी महायुतीत आले. या तिन्ही पक्षात ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत, त्या जागा त्यांना देण्यात याव्या. त्या जागांवर कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असे वाटत असेल तर त्या जागांची मागणी करायची, असे आहे.

Adv