गांजा विक्री करणाऱ्यांना कराड पोलिसांचा दणका

120
Adv

कराड पोलिसांनी विशेष पथक राबवून तब्बल सव्वा किलो गांजा जप्त केला असून या कामगिरीबद्दल कराड येथील कराड पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आहे मात्र सातारा शहर पोलीस स्टेशन, शाहूपुरी पोलीस स्टेशन, सातारा तालुका पोलीस स्टेशन, या पोलिसांना मात्र गांजाची एकही कारवाई करता येत नसल्याने संशयाची सुई पोलिसांवरच निर्माण होत आहे? कराड पोलिसांचा आदर्श घेऊन साताऱ्यातील पोलीस दादा गांजा व गुटक्या प्रकरण कारवाई करणार का याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले आहेत

साताऱ्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या काही हाकेच्या अंतरावरच गांजा व गुटख्याची विक्री केली जाते हे सर्व पोलिसांना माहीत असून याप्रकरणी पोलीस मुद्दामून डोळे झाक करत असल्याचे साताऱ्यातील नागरिक बघत असून पोलीस दादांनीच या अवैध धंद्याला पाठीशी घातले तर नागरिकांनी कोणाकडे बघायचे असा प्रश्न निर्माण होत आहे

अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत कराड डि.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी केली असून सव्वा किलोचा गांजा केला जप्त केला आहे मा. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल सो. अपर पोलीस अधीक्षक
सातारा, यांनी सातारा जिल्हयात अंमली पदार्थविरोधी मोहिम राबविली असुन अंमली पदार्था विरोधात कारवाई तीव्र करण्याच्या सुचना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री.अमोल ठाकुर सो. व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांना देवुन जास्तीत जास्त कारवाईकरण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री.अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार कराड शहर डि. बी. पथक प्रमुख श्री. आर. एल. डांगे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशीत कार्यवाही सुरु केली आहे.कराड शहर चर्च परीसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे अनुषंगाने विशेष मोहीम राबवुन सव्वा किलो गांजा केला जप्त. कराड शहर डि.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई.
कराड शहरालगत असले चर्च परीसरात काही इसम हे गांजा विक्री करीत असल्याची बातमी डि.
बी. पथकाचे प्रमुख श्री. राज डांगे यांना मिळाली. सदर बातमी बाबत त्यांनी सविस्तर माहिती मा. वरिष्ठ पोलीस
निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे श्री. प्रदीप सुर्यवंशी सो. यांना कळविली. मा. उपविभागीय पोलीस अधिकारीश्री. अमोल ठाकुर सो यांनी सदर ठिकाणी जावुन तात्काळ छापा कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी सो, डि.बी.पथक प्रमुख श्री. राज डांगे व डि. बी. पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) पवन सुभाष डावरे, वय 18 वर्ष 5 महिने, रा. मुजावर कॉलनी कराड व 2 ) यासरकादर शिकलगार, वय 20 वर्ष, रा. विश्रामनगर, मलकापुर कराड यांना जागीच ताब्यात घेतले, त्यांचेकब्जात सुमारे सव्वा किलो गांजा मिळुन आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप सुर्यवंशी सो कराड शहर पोलीस ठाणे यांनी यापुढे ही अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार असुन ती यापुढेही अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.सदरची कामगिरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल सो. अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. श्री. अमोल ठाकुर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, मा.प्रदीप सुर्यवंशी सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी.पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, अझर शेख सफौ संजय देवकुळे, पो. हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोषपाडळे, कुलदिप कोळी, पोलीस अंमलदार महेश शिंदे,मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख यांनी केलेली आहे.

Adv