शेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कामगार, ऊस तोडणी मजूर यांचे सुखाचे संसार चालवत आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम झाला असून तालुक्यातील एक मोठी संस्था बनला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणारा हा कारखाना आज पूर्णपणे सक्षम झाल्याने स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४- २५ च्या गळीत हंगामाची सांगता शेवटच्या ११ साखर पोत्यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.