गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे कठापूर योजना) समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फेज २ मध्ये करणे आणि उरमोडी मोठा प्रकल्पाच्या तिसऱ्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावाला जलशक्ती मंत्रालया मार्फत मान्यता देणे या दोन प्रमुख मागण्यांसह, कृष्णा नदीचे प्रदुषणरहित सौदर्यीकरणाकरीता स्वतंत्र स्वायत्त संस्थेची स्थापना करुन, नमामी गंगाचे धर्तीवर नमामी कृष्णा योजना राबविणे याकरीता केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी आर पाटील यांचेकडे निवेदन दिले.
केंद्रीय मंत्री ना.सी.आर.पाटील यांची समक्ष भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दुष्काळीभागाला वरदान ठरणा-या गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर योजना) या प्रकल्पास दि.११/०२/१९९७ रोजी प्रथम प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली, तसेच दि.११/१०/२०२४ रोजी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे या योजनेमध्ये ३२९३७ हे. क्षेत्राची वाढ झाली आहे. या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या फेज २ मध्ये सामावेश झाल्यास सातारा जिल्ह्यातील माण,खटाव,कोरेगाव व सातारा या दुष्काळग्रस्त भागातील सुमारे ३२९३७ हे. क्षेत्र ओलीताखाली जाऊन याचा १७६ गावांना लाभ होणार आहे. या योजनमध्ये ११ उपसा सिंचन योजना आहेत, ३ बॅरेज, ४ गुरुत्वीय उपनलिका आहेत. येरवा नदीवर १५ के.टी वेअर तसेच माण नदीवर १७ के.टी. वेअर आहेत. वर्धनगड बोगदा, आंधळी बोगदा यांचा देखिल सामावेश यामध्ये आहे. या प्रकल्पाचे पाणी माण व येरळा नदीत सोडण्यात येत आहे.
तसेच उरमोडी मोठा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावास जलशक्ती मंत्रालयाची मान्यता आवश्यक आहे. उरमोडी धरण ९.९६ टी एम सी चे असून सातारा जिल्ह्यातील २७७५० हे. जमिन ओलीताखाली येणार आहे. कण्हेर जोड कालवा व्दारे बोगदयामधून कण्हेर डावा कालव्यामध्ये नेऊन तेथुन पुढे आरफळ डावा कालवा कि.मी.४५ येथुन उरमोडी उपसा सिंचन योजनअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्प्यात ४५० फुट पाणी उचलून खटाव, माण भागातील दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. या उरमोडी मोठा प्रकल्पाच्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास दुष्काळग्रस्त भागाचा निश्चितच कायापालट होणार आहे, या दोन्ही बाबींकरीता भरघोस निधी केंद्राने वितरीत करावा
अशी मागणी सुध्दा केंद्रीय जलशक्ती मंत्री ना सी. आर पाटील यांचेकडे केली.
त्याचप्रमाणे क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली कृष्णानदी सातारा जिल्हयातील वाई,सातारा,कराड, या प्रमुख ठिकाणांहून, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा, व पुणे कर्नाटक, तेलंगणा भागातून, पश्चिमबंगालच्या बंगाल उपसागराला मिळते. कृष्णा नदी पिण्याच्या आणि सिंचनाचा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. तथापि औदयोगिक दुषित पाणी आणि सांडपाण्याचे प्रदुषण सर्रासपणे कृष्णानदीत होत आहे. जलपर्णीचा विळखा ठिकठिकाणी पडला आहे. त्यामुळे कृष्णानदीच्या घाटांचे सौदर्यीकरण बिघडत चालले आहे. याबाबतीत जलशक्ती मंत्रालयाने ठोस पावले उचलत नमामि कृष्णा उपक्रम राबविल्यास, स्वच्छता सौदर्यीकरणामुळे येथील पर्यटन वाढीला चालना मिळून, रोजगार वृध्दी होणार आहे. या सर्व उपाययोजना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने कृष्णा नदीकरीता स्वतंत्र स्वायत्त संस्था स्थापन करुन, त्याचे मुख्यालय सातारा किंवा कराड येथे करावे अशी मागणी देखिल केली. उपस्थित केलेल्या मुदयांबाबत आपण सकारात्मकतेने योग्य निर्णय घेवु असे आश्वासन यावेळी ना.पाटील यांनी दिले.
दरम्यान स्वत: पाठपुरावा करीत असलेले वरील तीनही मुद्दे दुष्काळीभागासह ग्रामस्थ नागरीकांच्या जीवनमानावर दूरगामी परिणाम करणारे असल्याने, याबाबत दुष्काळीभागातील शेतकरी वर्गासह नागरीकांमध्ये समाधान व्यक केले जात आहे.
याप्रसंगी , काका धुमाळ, ॲड.विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते.