Monday, April 6, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रामकृष्ण वेताळ स्वतःचा स्वाभिमान राखणार का

रामकृष्ण वेताळ स्वतःचा स्वाभिमान राखणार का

160
Adv

भाजपच्या कारकून गिरी करणाऱ्या अति शहाण्याने प्रदेश च्या नेत्याची हकलपट्टी केल्याने अजूनही चर्चेला उधाण आले असून कोपर्डे हवेली गटातून रामकृष्ण वेताळ हे अपक्ष म्हणून निवडून आले भाजपच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला त्यामुळे वेताळ यांचे स्वतःचे अस्तित्व असल्याचे दिसून आले

ऐन निवडणुकीत भाजपाशी एकनिष्ठ असलेले रामकृष्ण वेताळ यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली सदरची कारवाई कुठल्याही जिल्ह्याच्या नेत्याने केली नाही काही अतिशहाण्याने केली याचा स्वाभिमान रामकृष्ण वेताळ राखणार की पुन्हा भाजपबरोबर जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून स्वतःचा स्वाभिमान राखून रामकृष्ण वेताळ यांनी अन्य पक्षाचा मार्ग निवडावा अशी चर्चा सध्या त्यांच्या मतदारसंघात रंगते

रामकृष्ण वेताळ यांनी आमदारकीची तयारी केली होती त्यांना आमदारकी लढवायची असेल तर भाजपला सोडून शिवसेनेचा पर्याय उत्तम असल्याचेही कराड उत्तर मतदारसंघात बोलले जाते त्यामुळे रामकृष्ण वेताळ धनुष्यबाण हत्ती घेणार की पुन्हा भाजपच्या छता खाली जाणार हे बघणे आता उत्सुकतेचे असेल

Adv