Saturday, August 8, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषद सदस्य घात करणार की राष्ट्रवादीला साथ देणार?

जिल्हा परिषद सदस्य घात करणार की राष्ट्रवादीला साथ देणार?

101
Adv

ऑपरेशन लोटसचे लोन आता जिल्हा परिषद निवडणुकीत दिसू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडून आलेले सातारा शेंदुर्जने कोरेगाव एकंबे औंध येथील काही सदस्य यांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर स्वर्गीय अजित दादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अजितदादांच्या नावावर मते मागितली व विजयी झाले भाजप विरोधात सर्व ताकद लावून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आता मात्र काही सदस्यांवर भाजपने गळ टाकली असून निवडून आलेले सदस्य विमान अपघाताने अजित दादांचा नाही तर महाराष्ट्राचा घात झाला यातून जनता सावरत असताना घड्याळाचे उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांचा व मतदारांचा विश्वासघात तर करणार नाही ना अशी चिंता लागली आहे

राष्ट्रवादी व शिवसेनेला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी कौल दिला असून अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एक दिलाने राष्ट्रवादी व शिवसेना अशी संस्था स्थापन करावी अशीच अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक करत आहेत

Adv