Monday, May 18, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District शशिकांत शिंदे एकनाथ शिंदे यांच्या गळाला?

शशिकांत शिंदे एकनाथ शिंदे यांच्या गळाला?

84
Adv

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली असून विधान परिषदेत ही एकनाथ शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर केलेली शेरोशायरी व झेडपी निवडणुकीत दाखवलेला समतोल हेच मुख्य कारण असू शकते

आमदार महेश शिंदेंवर शशिकांत शिंदे सध्या नाराज असल्याचे चित्र दिसून येत असून महेश शिंदे शिवसेना वाढवण्यात कमी पडले असल्याचे त्यांच्या पक्षात बोलले जात असून एकनाथ शिंदेंनी शशिकांत शिंदे यांच्या रूपाने मोठा राजकीय जिल्ह्यात डाव खेळला असल्याचे बोलले जात आहे

शशिकांत शिंदे यांची शिवसेनेत एन्ट्री झाली तर कोरेगाव व जावलीत एक वेगळे चित्र निर्माण होईल यात तीळ मात्र शंका नसून येणाऱ्या काळातच शशिकांत शिंदे कोणत्या पक्षात जाणार की पुन्हा तुतारी हाती घेणार याकडे लक्ष लागले आहे

Adv