महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात

417
Adv

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाला पाच जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन तर काँग्रेसला एक जागा असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

विधानसभेची आचारसंहिता लागली असून येत्या आठ दिवसात आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालावधी असून मान खटाव,कराड उत्तर,कोरेगाव, वाई ,फलटण हे विधानसभेचे मतदार संघ शरद पवार गटाला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाला सातारा व पाटण व काँग्रेस पक्षाला कराड दक्षिण हे मतदारसंघ मिळू शकतात अशी माहिती मुंबईतील सूत्रांकडून वर्तवली जात आहे

मान खटाव मतदार संघात पाच उमेदवार इच्छुक असून या पाचही उमेदवारांना शरद पवारांनी मुंबईत या असा निरोप धाडला असून मान खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत निश्चित होणार असल्याचे समजते

Adv