Friday, September 4, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ

किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ

171
Adv

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विरोधी काम केले म्हणून भाजप जिल्हा कार्यालयातील कारखूनगिरी करणाऱ्या अति शहाण्यांनी थेट प्रदेशच्या नेत्याची हकालपट्टी करून आपली अक्कल पाजळवली होती या अकलपट्टीने जिल्ह्यातआश्चर्य व्यक्त केले गेले

रामकृष्ण वेताळ यांची पाच वर्षासाठी हकलपट्टी केली असे पत्र भाजपच्या विठ्ठलाच्या साक्षीने काही अतिशहाण्याने स्वतःच्या सही ने काढले या पत्राला एक महिना व्हायच्या अगोदरच भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली व जिल्हा कार्यालयाला चपराक मारली

रामकृष्ण वेताळ हे मूळचे भाजपचे 2016 सालापासून भाजपची कारखुनगिरी करणाऱ्या व्यक्तींना भाजप कळली नाही जिल्हा कार्यालयात काम कमी आणि अति श..हाणेपणा जास्त अशीच परिस्थिती बघायला मिळते

जिल्ह्यातील नेत्याच्यात काही महाभागानी भांडणे लावली स्वतःच्या अतिशहाणेपणाने व विठ्ठलाच्या साक्षीने जिल्ह्यातील नेत्यांच्यात वाद लावला असून नेत्यांनी या अतिशहाणेपणा करणाऱ्यांना व स्वयंपोषीत स्वतःला भाजपचा विठ्ठल समजणाऱ्यांना वेळीच आवर घालावी अशी मागणी होत आहे

Adv