Thursday, October 15, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेला पहिला बिनविरोध संचालक! एकनाथ शिंदेंच्या समर्थक संजय मोरेंची बाजी

जिल्हा बँकेला पहिला बिनविरोध संचालक! एकनाथ शिंदेंच्या समर्थक संजय मोरेंची बाजी

100
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाबळेश्वर विकास सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक संजय मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र राजापुरे आणि त्यांच्या पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने मोरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत न्यायालयीन घडामोडींमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. संजय मोरे हे जिल्हा बँकेचे पहिले बिनविरोध निवडून आलेले संचालक ठरल्याने या निवडीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यापुढे कोणत्या मतदारसंघात बिनविरोध निवडी होणार आणि कोणत्या ठिकाणी राजकीय संघर्ष रंगणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Adv